डिमॅट खाते कोठे व कसे उघडावे ?
मित्रांनो डिमॅट खाते उघडणे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चे पहिले पाऊल असते. डिमॅट खात्यात शिवाय आपण शेअर मार्केट मध्ये कुठेही व्यवहार करू शकत नाही. या लेखाच्या माध्यमातून आपण डिमॅट अकाउंट कुठे व कसे उघडावे याविषयी माहिती घेणार आहोत.
डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया -
1. सर्वप्रथम आपल्याला कुठल्या स्टॉक ब्रोकर कडे आपले डिमॅट खाते उघडायचे आहे, याची निवड करावी लागते. आम्ही UPSTOX वर खाते काढले आहे. UPSTOX ही रतन टाटा फंडेड कंपनी आहे. जर तुम्हाला UPSTOX वर खाते काढायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.
UPSTOX वर खाते काढण्यासाठी : Click Here
2. त्यानंतर स्टॉक ब्रोकर कडे जाऊन डिमॅट खाते ओपन करण्यासाठीचा फॉर्म भरा. आजकाल हा फॉर्म ऑनलाइन सुद्धा भरता येतो.
3. फॉर्मवर विविध ठिकाणी सह्या करा व आपले छायाचित्र चिटकवा.
4. त्यानंतर आपल्याला नियमांची व करारपत्रांची प्रत दिली जाईल ती नीट वाचा व त्यावर सह्या करा.
5. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांच्या छायांकित प्रती ब्रोकर ला द्या.
6. त्यानंतर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी चे शुल्क भरावे लागेल.
7. शुल्क भरल्यानंतर स्टॉक ब्रोकर फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष तुमचे सत्यापन (Verification) करेल.
7. त्यानंतर स्टॉक ब्रोकर तुम्हाला डिमॅट खाते क्रमांक व व ग्राहक आयडी देईल.
8. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही स्टॉक ब्रोकर च्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲप च्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये शेअर्स खरेदी व विक्री करू शकता.
डिमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे -
डिमॅट खाते उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. पॅन कार्ड
2. रहिवास प्रमाणपत्र (खालील पैकी एक)
आधार कार्ड
पासपोर्ट
रेशन कार्ड
वोटर आयडी
ड्रायव्हिंग लायसन्स
विज बिल
3. पासपोर्ट साईज फोटो
4. बँकेचा क्रॉस चेक
5. बँक खाते स्टेटमेंट
0 Response to "डिमॅट खाते कोठे व कसे उघडावे ?"
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!