सोलापूरकरांसाठी खुशखबर! ट्रॅव्हल्सच्या दरात सोलापूर-मुंबई-गोवा विमान प्रवास; संभाव्य दर व वेळापत्रक जाहीर !
सोलापूर : गोवा येथील फ्लाय ९१ या विमानसेवा देणाऱ्या कंपनीने सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई या फेऱ्या २३ डिसेंबरपासून सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले असून संभाव्य दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामधील प्रारंभिक दर हे ट्रॅव्हल्सच्या दराइतकेच आहेत.
प्रवासाच्या तारखेच्या किमान तीन ते चार महिने अगोदर तिकिटे काढल्यास दर अत्यंत कमी मिळतात. अशीच बुकिंग केल्यास गोव्यासाठी अवघ्या ६८९ रुपयात तर मुंबईसाठी एक हजार ४८८ रुपयात तिकीट उपलब्ध होणार आहे. त्यावर इतर कर व जीएसटीसह ही रक्कम ट्रॅव्हल्सच्या दराइतकीच होणार आहे. फ्लाय ९१ ने संभाव्य दरपत्रक नुकतेच त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. हे संभाव्य दर स्वस्तात आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या बजेटमध्ये आहेत. सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी फ्लाय ९१ कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात मेलद्वारे माहिती मागितली आहे. त्यावर त्यांना संभाव्य दर मिळाले आहेत. फ्लाय ९१ च्या जनसंपर्क अधिकारी स्टेला फर्नांडिस यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता अधिकृत दर अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचे सांगितले.
प्रारंभिक तिकीट दर अत्यंत कमी
सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त १ हजार ४८८ पासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये हे दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी व उपलब्धतेनुसार ठरवले जातात. जास्तीत जास्त दर ९ हजार ५८४ पर्यंत असू शकतात. अतिरिक्त शुल्कात २१७ रुपये युजर डेव्हलपमेंट फी (युडीएफ), २३६ रुपये विमान सुरक्षा शुल्क (एएसएफ) आणि ५ टक्के जीएसटी यांचा समावेश होतो. सोलापूर ते गोवा या मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ६८९ आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर ८ हजार ७८५ पर्यंत जाऊ शकतात. अतिरिक्त शुल्क युडीएफ, एएसएफ आणि जीएसटी हे कर मुंबई मार्गाप्रमाणेच आहेत.
ट्रॅव्हल्सचे दर
(सोलापूर- गोवा)
हमसफर ट्रॅव्हल्स : १३५० रुपये
कदंबा (सोलापूर-वास्को) : ८५० रुपये
एसटी साधी (सोलापूर- पणजी) : ६९० रुपये
----------------------------------------------------------------------------
(सोलापूर- मुंबई)
विश्वजित ट्रॅव्हल्स : १००० रुपये
जगदंबा ट्रॅव्हल्स : ६०० रुपये
कोलम ट्रॅव्हल्स : १००० रुपये
------------------------------------------------------------------------------
विमानाचे वेळापत्रक
मुंबई ते सोलापूर
निर्गमन : सकाळी ११: ५५
पोचणार : दुपारी १:४५
सोलापूर ते मुंबई
निर्गमन : सकाळी ९:४०
पोचणार : सकाळी ११:२०
----------------------------------------------------------------------------
गोवा ते सोलापूर
निर्गमन : सकाळी ८:००
पोचणार : सकाळी ९:१०
सोलापूर ते गोवा
निर्गमन वेळ : दुपारी २:१५
पोचणार वेळ : दुपारी ३:३०
व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार
सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा इमेल प्राप्त झाले आहे. सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवांमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार आहे.
0 Response to "सोलापूरकरांसाठी खुशखबर! ट्रॅव्हल्सच्या दरात सोलापूर-मुंबई-गोवा विमान प्रवास; संभाव्य दर व वेळापत्रक जाहीर !"
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!