फुफ्फुसे निरोगी होण्यासाठी करा ही सोपी ५  आसने...

फुफ्फुसे निरोगी होण्यासाठी करा ही सोपी ५ आसने...

                                     

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण व्यायामासाठी बाहेर पडू शकत नाहीत. अशा वेळी श्वसन प्रणाली आणि फुप्फुसे निरोगी बनवण्यासाठी काही योगासने उपयोगी ठरू शकतील. ही आसने शरीरात ऑक्सिजनची पातळी चांगली राखण्यासाठी मदत करतात.

  1. वृक्षासन :-  या आसनात एका पायावर उभे राहून दोन्ही हात डोक्यावर जोडून उलटा वी तयार केला जातो. या स्थितीत जाताना दीर्घ श्‍वास घ्यावा लागतो आणि सामान्य स्थितीत परत येताना श्वास सोडावा लागतो

  2. ताडासन :-आपण पायाच्या पंज्यावर तुझ्यावर सरळ उभे राहून दोन्ही हात डोक्याच्या वर जोडून ओडतो. तेव्हा श्वसन संस्थेत ऑक्सिजन साठी अधिक जागा तयार होते. यामुळे फुप्फुसाची क्षमता वाढते.

  3. मत्स्यासन :- यात मांडी घालून जमिनीवर बसून डोके मागच्या बाजूने जमिनीला टेकवायचे असते पाठीचा मणका जमिनीपासून वर असतो. छाती वर उचललेली असते. त्यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजनसाठी अधिक जागा तयार होते.

  4. बलासन :- जमिनीवर वज्रासनात बसून दोन्ही हात जमिनीला टेकवावेत. यामुळे श्वसन पॅटर्न नियमित होतो. फुफ्फुसात ऑक्सिजन वाढतो आणि रक्तातही जास्त पोहोचतो.

  5. त्रिकोणासन :- सरळ उभे राहा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडत एक हात खाली आणा व दुसरा हात आकाशाकडे करा. यामुळे पोटाच्या बाह्य स्नायूंचा व्यायाम होतो आणि श्वसन क्रिया चांगली होते.

0 Response to "फुफ्फुसे निरोगी होण्यासाठी करा ही सोपी ५ आसने..."

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article