शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे जाणून घ्या....

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे जाणून घ्या....



 शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे : 

  • शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
  • यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
  • यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते. 
  • यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
  • यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.
  • हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.
  • यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो. 
  • यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते

0 Response to "शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे जाणून घ्या...."

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article