शेअर मार्केट मध्ये आय पी ओ म्हणजे काय | What Is IPO in Share Market

शेअर मार्केट मध्ये आय पी ओ म्हणजे काय | What Is IPO in Share Market


                            

 नमस्कार मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आयपीओ हा अतिशय जिव्हाळ्याचा शब्द आहे. ह्या लेखाद्वारे आपण आयपीओ विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

आय पी ओ म्हणजे काय -

IPO म्हणजे initial public offer होय. जेव्हा एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरत असेल तेव्हा त्या कंपनीला आपल्या शेअर्सची विक्री IPO द्वारे करावी लागते. IPO च्या माध्यमातून कंपनी थेट गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सची विक्री करून भांडवल उभारते व‌ गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स विकत घेतात.

IPO ची प्रक्रिया -

ज्या कंपनीला शेअर मार्केट मध्ये आपले शेअर्स लिस्ट करून भांडवल उभारायचे असते, अशा कंपनीला सेबी (Securities and Exchange Board of India) तसेच अन्य संस्थांकडून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर आपल्या कंपनीची सर्व माहिती व आयपीओ ची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. आयपीओच्या जाहिरातीत कंपनीच्या आर्थिक स्थितीची माहिती द्यावी लागते. त्यानंतर कंपनी तीन दिवसाचा कालावधी ठरविते या तीन दिवसात गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओचा ऑनलाइन फॉर्म भरतात. कंपनी शेअरचे वितरण करण्यासाठी लॉटरी पद्धतीचा वापर करतो. त्यानंतर ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स मिळालेले आहेत त्यांच्या डिमॅट अकाउंट मध्ये ते शेअर्स क्रेडिट केले जातात. व ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांच्या पैसे परत केले जातात. त्यानंतर कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होते.

IPO चे फायदे -

आयपीओ म्हणजे एक प्रकारचे लॉटरी असते. आयपीओमध्ये अतिशय कमी कालावधीत व अतिशय कमी जोखीम घेऊन तुम्ही लखपती बनवू शकता. साधारणता अनेक आयपीओ मध्ये फक्त आठ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झालेले आहेत. शेअर मार्केटमध्ये अतिशय कमी कालावधीत मोठा पैसा आयपीओ द्वारे कमावता येतो. आयपीओ द्वारे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट सुद्धा होतात. परंतु यासाठी नशिबाची साथ आवश्यक असते, कारण ‌आयपीओ लॉटरी पद्धतीने वितरित होत असल्यामुळे आयपीओमध्ये प्रत्येकाला शेअर्स मिळत नाहीत. तसेच अनेक आयपीओ मध्ये गुंतवणूकदारांना नुकसान झालेले आहे. त्यामुळे कोणत्याही आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना सर्व माहिती घेणे आवश्यक असते.


उदाहरणार्थ -
BurgerKing कंपनी च्या IPO मध्ये एका शेअर ची किंमत Rs.59 to Rs.60 per equity share आणि 250 Shares होती.पण जेव्हा ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली तेव्हा एका शेअर ची किंमत Rs 115.35 होती. म्हणजे एकुण 92% फायदा फक्त 15 दिवसात झाला. 

टिप :- जर तुम्हाला डिमॅट खाते कसे काढायचे जाणून घ्यायचे असेल तर क्लिक करा.

0 Response to " शेअर मार्केट मध्ये आय पी ओ म्हणजे काय | What Is IPO in Share Market"

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article