१०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी मोठी भरती जाहीर

१०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी मोठी भरती जाहीर

 


१०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी मोठी भरती जाहीर

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Central Reserve Police Force (CRPF) ने कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समॅन आणि पायनियर) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ९,१९५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून १९ मे २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करून त्यानंतर अर्ज भरावा लागेल.https://crpf.gov.in/

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवार किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट पदांसाठी, जसे की ड्रायव्हर आणि मेकॅनिक, संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र किंवा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेच्या बाबतीत, ड्रायव्हर पदांसाठी वय २१ ते २७ वर्षे ठेवण्यात आले आहे, तर इतर पदांसाठी १८ ते २३ वर्षे वयोमर्यादा आहे. याशिवाय SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. माजी सैनिकांनाही नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

शारीरिक पात्रतेमध्ये पुरुष उमेदवारांची उंची १७० सेमी आणि महिला उमेदवारांची उंची १५७ सेमी असावी लागते. पुरुष उमेदवारांसाठी छाती ८० सेमी असून ५ सेमी फुगवटा आवश्यक आहे. तसेच शारीरिक चाचणीत पुरुष उमेदवारांना ५ किमी अंतर २४ मिनिटांत पूर्ण करावे लागेल, तर महिला उमेदवारांना १.६ किमी अंतर ८.५ मिनिटांत पूर्ण करावे लागेल.

अर्ज शुल्काबाबत, सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी ₹१०० शुल्क आहे, तर SC/ST, महिला आणि माजी सैनिकांसाठी अर्ज मोफत आहे.

निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये फिजिकल टेस्ट (PET/PST), संगणक आधारित परीक्षा (CBT), ट्रेड टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. अंतिम निवड ही CBT परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.



0 Response to "१०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; CRPF मध्ये ९,१९५ पदांसाठी मोठी भरती जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article