तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, तुळजापूरचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
तुळजापूर-
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले यात तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता ५ वी मधील १९ तर इयत्ता ८ वी मधील १३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
इयत्ता ८ वी मधील रोहित प्रदीप शिंदे याने २४२ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. आयुष राजेश जगताप याने २०८ गुण मिळवून द्वितीय तर असावरी अविनाश क्षीरसागर हिने १९४ गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
इयत्ता ५ वी मधील विक्रांत दयानंद जाधव याने १९८ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. दिशा दिनेश बिरकुटे हिने १७० गुणांसह द्वितीय तर वीर सुरेश गुरव याने १६४ गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. संभाजी भोसले सर सचिव श्री. धनंजय पाटील सर, श्री. प्रशांत कदम सर, श्री. रमेश नानवरे सर, श्री. अमर भैया मगर सर, श्री. दिलीप भोसले सर प्राचार्या. लोध मॅडम मुख्याध्यापक राजेश जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना दशरथ शिंदें
वर्गशिक्षिका पाकीजा सिद्दिकी,राणी जगताप, स्नेहा पांचाळ, सोनाली कवठेकर, तृप्ती नाईक,अनाघा चौगुले, दीपाली तुगावंकर लुबना शेख तसेच भाग्यश्री दुरुगकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Response to " तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, तुळजापूरचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश"
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!